उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विभाजनाला विरोध करत विभाजन केल्यास आत्मदहनाचा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेना उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 

सदर निवेदनात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव मराठवाडा विद्यापीठास मिळावे यासाठी अनेक आंबेडकरी कार्यकर्ते यांनी स्वतः  आत्मदहन केले.हा संघर्ष 17वर्षे चालला . त्यामध्ये अनेक कुटुंबे उध्वस्त झाली.व इतक्या प्रदीर्घ संघर्षानंतर ही नामांतर न होता केवळ नामविस्तार झाला तो ही जातीयवादी लोकांच्या आजतागायत जिव्हारी लागला आहे.याची आम्हाला जाणीव आहे.व तीच मानसिकता ठेवून केवळ भारताच्या भाग्यविधात्याचे नाव विद्यापीठाला दिले म्हणून या ना त्या कारणाने विद्यापीठास बदनाम करण्याचे मनसुबे ठेवून मनुवादी मानसिकतेचे अनेक लोक कार्यान्वित झाले आहेत.याच प्रकारच्या षडयंत्राचा भाग म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद येथे 2004साली स्थापित केलेल्या उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.या मागणीला ऑल इंडिया पॅंथर सेनेचा विरोध आहे.विद्यापीठ विभाजनाच्या हालचाली तात्काळ थांबवाव्यात. अन्यथा नामांतराच्या संघर्षात आमच्या पुर्वजांनी प्राणाची आहुती दिली.त्याचप्रमाणे आत्मदहन केले जाईल,असे निवेदन राज्यपालांना ऑल इंडिया पॅंथर सेना उस्मानाबाद जिल्हा च्या वतीने देण्यात आले त्यामध्ये म्हटले आहे . 

यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेना उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धनंजय हुंबे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कसबे,युवा जिल्हाध्यक्ष यशपाल गायकवाड, पृथ्वीराज वाघमारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top