उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या फोटोला काळे फासत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.  उस्मानाबादेत छावा संघटना तानाजी सावंत याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली . राऊत यांनी सावंत व मराठा समाजाची बदनामी केल्याने छावा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

आमदार तानाजी सावंत यांना खासदार संजय राऊत यांनी सूर्याजी पिसाळ उपमा दिल्याने राऊत विरोधात आंदोलन करण्यात आले. सावंत यांनी मराठा आरक्षण आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे त्यांना काही उपमा देऊन राऊत यांनी मराठा समाजाचा अपमान केल्याचे कार्यकर्ते यांनी सांगितले.

या आंदोलनात छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, युवक जिल्हाध्यक्ष कालिदास गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ साळुंके, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष रोहित पाटील, मराठवाडा सोशल मीडियाचे वासुदेव पाचंगे, योगेश मोरे, प्रेम म्हेत्रे, धनंजय शिंदे यांचेसह छावाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top