उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व युवानेते मल्हारदादा पाटील यांच्या वाढदिवसा निमीत्त सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन मार्डी ता. लोहारा येथे करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात मार्डी व परिसरातील सर्व वयोगटातील २०१ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.संतोष गंभीरे (प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मार्डी) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे ग्रामसेवक श्री सय्यद, अप्पासाहेब देवकर, कृष्णा कदम, संपत देवकर, शिवाजी मसके, तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुंबईचे डॉ.कविता सिंग, डॉ.प्रितम गुप्ता, डॉ. सिमरन नेगी, डॉ.रेहान सिद्दीकी, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच कार्यक्रम समन्वयक बाळु देवकर, फार्मासिस्ट शुभम चिवटे, राहुल थोडसरे, अजीत, यांनी परीश्रम घेतले.


 
Top