तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कॉलेज वडाळा यांच्यावतीने तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील दहावी आणि बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. यानिमित्ताने संस्थेचे मार्गदर्शक तथा संस्थेचे अध्यक्ष  रोहन देशमुख हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. 

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते  गणेश शिंदे   उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना  गणेश शिंदे म्हणाले की इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त केले त्या विद्यार्थ्यांनी पुढील काळात कष्टाने मेहनतीने अभ्यास करून पुढील शिक्षणक्रमात यश संपादन करणे गरजेचे आहे याप्रसंगी बोलताना श्री रोहन देशमुख म्हणाले की सर्वसामान्य गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना लोकमंगल समूहाच्या माध्यमातून नेहमीच शिष्यवृत्ती देऊन शिक्षण देण्यात आलेले आहे ते यापुढील काळातही दिले जाईल याकरता गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

या कार्यक्रमाकरिता लोकमंगल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश देवकर सर जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर किरण जगताप सर प्राचार्य योगेश गायकवाड प्राचार्य रोहित माने प्राचार्य  श्रीकांत धारूरकर  पालक प्रतिनिधी दत्तात्रेय राजमाने उपस्थित होते. व तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता तुळजापूर संपर्क कार्यालयाचे श्री विनोद देवकर श्री लक्ष्मण गाटे क्रीडाशिक्षक गोकुळ यादव श्री दिपक कापसे सौ अश्विनी टोणपे मल्टीस्टेट चे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमास 378 विद्यार्थी उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर किरण जगताप यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य श्रीकांत धारूरकर यांनी केली.


 
Top