तुळजापूर/ प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर झाला असुन यात २४४९ विद्यार्थी पास झाले असुन निकाल 93.75टक्के निकाल लागला आहे.

तुळजापूर तालुक्यातुन २६१२ विद्यार्थी बसले होते यात १५२३ मुले, १०८९ मुलींची संख्या आहे.  यात  २४४९विद्यार्थी पास झाले असुन यात १४०९मुले व १०४०मुलीचा समावेश आहे.

एचएससी साठी २६५१ विद्यार्थांनी रजिस्ट्रेशन केले.  त्यात १५३८ मुले व १११३ मुलींचा समावेश आहे. यंदा ९५.५९ टक्के मुली तर ९२.५१ टक्के मुले पास झाले. रिपीटरसाठी ९९ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ६० पास होवुन निकाल ६०.६६ टक्के लागला आहे.   कोरोनानंतर बारावीच्या झालेल्या परीक्षांमुळे यंदाच्या निकालाची उत्सुकता होती ती आज  अखेरज ाहीर होवुन संपुष्टात आली.


 यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा  निकाल 96.55%

  तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा बारावी  विज्ञान शाखा 100% , कला शाखा 93.6%, वाणिज्य शाखा 94.54% व किमान कौशल्य  100% असा निकाल लागला आहे. या घवघवीत यशा बद्दल संस्थेचे सचिव  उल्हासदादा बोरगावकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि यशवंत विद्यार्थी यांचे त्यांनी  अभिनंदन केले आहे.

 महाविद्यालयाचे प्र प्राचार्य  डॉ अनिल शित्रे, उपप्राचार्य डॉ नरसिंग जाधव , कनिष्ठ विभाग  उप-प्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.


 
Top