तुळजापूर/ प्रतिनिधी-

  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित , श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , तुळजापूर या विद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च - एप्रिल 2022 चा निकाल 100 % लागलेला आहे . 

यामध्ये एकूण 59 विद्यार्थी परीक्षेस बसले होते . त्यापैकी 14 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर 45 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत . या परीक्षेत गुणानुक्रमे . अ.क विद्यार्थ्याचे नाव टक्केवारी 1 ) कु . राठोड सुशांत शिवाजी 82.83 % 2 ) कु . पाटील श्रीनिवास प्रविण 81.33 % 3 ) कु . यादव विशाल जीवन 80.00 % गुण घेवून विद्यालयातून प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत . सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे , प्राचार्य व मार्गदर्शक शिक्षकांचे , श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष मा . जिल्हाधिकारी , उस्मानाबाद श्री कौस्तुभ दिवेगावकर , मा . आमदार , तुळजापूर तथा विश्वस्त सदस्य , श्री राणाजगजीतसिंह पाटील , मा . उपविभागीय अधिकारी , उस्मानाबाद तथा विश्वस्त सदस्य , डॉ योगशे खरमाटे , मा . तहसीलदार , तुळजापूर तथा विश्वस्त सदस्य श्री सौदागार तांदळे , मा . तहसीलदार तथा व्यवस्थापक ( प्रशासन ) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर श्रीमती योगीता कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे . कु . पाटील श्रीनिवास प्रविण राठोड 82.83 % सुशांत शिवाजी कु यादव विशाल जीवन 81.33 %


 
Top