उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मा. पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान जिल्हाभरात ऑलआऊट व कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. यावेळी उमरगा पोलीस ठाण्याचे पोनि- श्री राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की, औटी प्लॉट, उमरगा येथील श्रीनिवास जनार्धन पाटील हे आपल्या घरी गांजा हा अंमली पदार्थ बाळगून आहेत. यावर उमरगा पो.ठा. च्या पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकला असता श्रीनिवास पाटील हे त्याचे उमरगा येथील साथीदार विशाल मारुती मंजुळे, गणेश भिमा धोत्रे व श्रीकृष्ण दुर्गादास जाधव यांसह आपल्या घरात प्लास्टीकच्या पिशवीत 198 ग्रॅम तर चिकटपट्टी व नायलॉन दोरीने गुंडाळलेल्या पुडक्यात 2.107 कि.ग्रॅ. असा एकुण 2.305 कि.ग्रॅ. गांजा हा अंमली पदार्थ बाळगलेले आढळले. यावेळी नायब तहसीलदार, उमरगा व दोन पंचांच्या समक्ष तो गांजा जप्त केला आहे.

 यावरुन उमरगा पो.ठा. चे सपोनि- श्री. रमेश जाधवर यांनी आज दि. 21 जून रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उपरोक्त चौघांविरुध्द एनडीपीएस ॲक्ट कलम- 20 (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.


 
Top