परंडा/ प्रतिनिधी 

परंडा तालुक्यातील सिरसाव ची कन्या कुमारी हुमेरा रियाज पठाण हीचा प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान राज्य स्तरीय (मंथन ) परीक्षेत राज्यात ६ वा क्रमांक पटकाविला आहे.

  सदर परीक्षा महाराष्ट्रातील २५ पेक्षा अधिक जिल्हात राबवली जानारी ऐकमेव शासन मान्य परीक्षा असुन या परीक्षामध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होतात. सदर परीक्षा हि इयत्ता १ ली ते ८ वी या वर्गातील (मराठी, सेमी, इंग्रजी या माध्यमात राबवली जाते.) सदर परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुकयात राबवली जाते सादरणपणे १५ ते १६ हजार विदयार्थी सहभागी झाले होते.सदर परीक्षेत सोलापूर जिल्हयातील बार्शी तालुकयातील काही विद्यार्थी राज्याच्या यादीत चमकले.राज्यस्तरीय मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये  ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य व स्टार माझा न्यूज चे संपादक रियाज पठाण यांची कन्या कुमारी हुमेरा रिहाज पठाण हिने १५० पैकी १४० गुण मिळऊन महाराष्ट्र राज्यात ६ वा क्रमांक पटकावला व परंडा तालुक्या सह बार्शी शहराचे व शाळेचे नाव उज्वल केले.अभिनव विद्यामंदिर बार्शी येथील सर्व शिक्षकांनी हुमेरा पठाण हीचे कौतुक करून अभिनंदन केले, तसेच वर्ग शिक्षिका श्रीमती काळे मॅडम व शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ यांनी हुमेराला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले.यामध्ये वर्ग शिक्षिका श्रीमती काळे मॅडम यांनी व खाजगी शिक्षिका श्रीमती अंबिका मिरगणे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.तसेच  तिच्याआई अफसाना रियाज पठाण यांनी शाळेत शिकवलेल्या अभ्यासाचा घरी वेळोवेळी सराव करून घेतला त्यामुळे कुमारी हुमेरा रियाज पठाण ही यश संपादन करू शकली असे तिच्या कुटुंबियांकडून सांगन्यात आले. या मिळवलेल्या यशाचे हुमेरा पठाण हिचे सर्वत्र कौतुक,अभिनंदन होत आहे.


 
Top