उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन वाकडी (केज) ता. कळंब येथे  या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात वाकडी (केज) व परिसरातील सर्व वयोगटातील २२५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा तालुका अध्यक्ष अजित (दादा) पिंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे आबासाहेब रणदिवे (भाजपा तालुका अध्यक्ष अनु-जाती मोर्चा), बाबासाहेब रणदिवे, अंगद कोल्हे, राजाभाऊ पुरी, गणेश कोल्हे, सुनिल ताटे (कामगार मोर्चा मराठवाडा अध्यक्ष), सौ.परीमला कोल्हे (सरपंच), श्रीमंत होल्हे, संजय रणदिवे, वसुदेव कुरुंद, चंद्रकांत पाटील, दिलीप रणदिवे, आशा कार्यकर्त्या निर्मला पाटील, मनिषा कोळी तसेच सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुंबईचे डॉ अजित निळे, डॉ.निलेश येणापूरे, डॉ.ऋषीकेश जाधव, डॉ.स्वप्नील नायक, डॉ. शुभम सिंगटकर, डॉ परविन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओहळ (जनसंपर्क अधिकारी), नामदेव शेळके (कळंब तालका जनसेवा केंद्र प्रमुख), पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे, यांनी परीश्रम घेतले.

 
Top