उस्मानाबाद  (प्रतिनिधी)

आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारा व जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहित त्यांना दंड करणारा  भारतातील पहिला राजा म्हणजे ,छञपती शाहू महाराज होय. मागेल त्या गावाला देऊळ व चावडी बांधून देतानाच भरमधात शाळा बांधून देणारा  व देवळाची ,चावडीची झाडझोड करतानाच शाळांचीही करावी असे सांगणारे शाहू महाराज. कोल्हापूरात राजाराम काॅलेजची निर्मिती करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उच्य शिक्षणाची सोय करून सर्व जाती,धर्मातील मुलांची शहरात शिक्षणाची सोय व्हावी म्हणून बोर्डिंगा काढून त्यांनी तळागळापर्यंत शिक्षण पोहचवले आज जी शाळा,महाविद्यालयाची गर्दी दिसते व बहुजनांचे असंख्य विद्यार्थी शिक्षण घेताहेत त्याचे श्रेय छञपती शाहू महाराजांना असून त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेञात क्रांतीच केली असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ६मे रोजी, छञपती शाहू महाराज यांच्या १००व्या, स्मृतीदिनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.ए,डी.जाधव यांनी केले आहे.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख होते यावेळी उपप्राचार्य प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.माधव उगीले उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांनी छञपती शाहू महाराज,डाॅ.बापूजी साळुंखे,संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे प्रतिमाचे पुजन केले.

पुढे बोलताना प्रा.जाधव म्हणाले की,शाहू राजांनी समता स्थापन करण्यासाठी सर्व जातीच्या मुलांना एकञ वर्गात बसवले,भटक्या माणसांना काम देऊन त्यांच्या चो—या करणं बंद केलं शेतक—यांच्या कल्याणासाठी ते अहोराञ झटले.सगळ्यात महत्वाचे म्हणजे बुध्दीचा ज्ञानसागर असणा—या डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी बळ दिले.आजच्या विद्यार्थ्यांनी छञपती शाहू महाराज यांचे विचार आत्मसात करावेत असे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,छञपती शाहू महाराज यांचे कार्य व त्यांचे चरिञ्य व इतिहास आजच्या नव तरूणांना व्हावा यासाठी प्रा.ए.डी.जाधव यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.शाहू राजांनी मागास समाजाचा विकास व्हावा यासाठी आपल्या संस्थानात १९०२मध्ये पंन्नास टक्के आरक्षण दिले त्यामुळेच वंचित समाज प्रवाहात आला.सुसंस्कारित विद्यार्थी घडवण्याचे कार्य हे महाविद्यालय सातत्याने करत आले आहे व करते आहे आपल्या विद्यार्थ्यामधून छञपती शाहू महाराज यांचेवर संशोधन करणारे विद्यार्थी निर्माण व्हावेत आसा त्यांनी आशावाद व्यक्त केला.प्रास्ताविक प्रा.माधव उगीले यांनी केले सूञसंचालन डाॅ.केशव क्षीरसागर यांनी केले आभार डाॅ.शिवाजी गायकवाड यांनी मानले.यावेळी प्राध्यापक,विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top