उस्मानाबाद / प्रतिनिधी-
केंद्र सरकार मधील सीबीआय, ईडी या यंत्रणा स्वंयत्ता असणाऱ्या संस्था आहेत. त्याचा कारभार पारदर्शक होणे आपेक्षीत आहे. परंतू राज्यातील मंत्र्यावर व इतरांवर सीबीआय किंवा ईडी कारवाई करण्या अगोदरच भाजपचे कांही नेते माध्यमांशी बोलून आरोप करतात, त्यानंतर ईडी किंवा सीबीआय संबंधीतावर करवाई करते. हा कांही स्वंयत्ता असलेल्या  संस्थेचा पारदर्शक कारभार नाही, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकार परिषदेत केली. जिल्हयातील राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी राज्यपातळीवरील कांही पदे देणार का ? यावर ही त्यांनी गोलमोल उत्तरे दिली. विशेष म्हणजे अजित पवार यांची सासरवाडी असलेले व पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे माजीमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांनी पक्षाला व पवार साहेबांना दिलेली साथ आष्युभर विसरू शकत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 
खासदार सुप्रियाताई सुळे यांचा गेल्या चार दिवसापासून मराठवाडा दौरा सुरू आहे. रविवार दि.२९ मे रोजी खा. सुळे यांचा उस्मानाबाद शहरात भरगच्च कार्यक्रम होते. त्यानंतर दुपारी त्यांनी सर्कीट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जीवनराव गोरे, आ. विक्रम काळे, माजी आ. राहुल मोटे, वैशालीताई मोटे, संजय िनंबाळकर, संजय दुधगावकर, नितीन बागल, नंदकुमार गवारे, अमित शिंदे,  मसूद शेख आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. सुप्रियाताई सुळे  यांनी     माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत बोलताना देशमुख यांच्यावर १०९ वेळा धाडी टाकल्या तर आरोप करणारे यांना माफीचा साक्षीदार केला गेला . मुख्यमंत्र्यावर १९ बंगले असल्याचा आरोप केला गेला. पाहाणी अंती एक ही बंगला तिथे नसल्याचे दिसून आले. अखेर सत्यमेव जयते  अशी प्रतिक्रिया सुळे यांनी व्यक्त केली. 
 आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र
मराठवाडा हे संताची भूमी आहे, येथे अनेक ऐतिहासिक ठेवा आहे. त्यामुळे ८ ते १० दिवसाचे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र येथे होऊ शकते, असे सांगून खासदार सुळे यांनी तेर येथील संत गोरोबा काका मंदीरास आपण भेट दिली असून तेथील ऐतिहासीक ठेवा ही आपण पाहिला आहे. त्यासंदर्भातील विकासनशील आराखडा अापण अजितदादा पवार यांच्याकडे देणार असल्याचे सांगितले. 
राणादादाचे पत्र द्या पाठपुरावा करते 
पत्रकार परिषदेत पत्रकारांनी केंद्र सरकार ने सोलापूर-तुलजापूर-उस्मानाबाद रेले मार्गाबाबात आतापर्यंत ३२ कोटी रुपये दिले आहेत. परंतू राज्य सरकार आपला ५० टक्के वाटा देत नाही. या संदर्भात  आमदार राणाजगजितसिंह पाटील नेहमीच आरोप करतात.याबाबत  सदंपत्रकारांनी विचारले असता खासदार सुळे यांनी राणादादाचे राज्यसरकारला विचारणारे पत्र माझ्याकडे द्या मी पाठपुरावा करते, असे सांगितले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी राज्यपातळीवरील कांही पदे आपण देणार का? असे विचारले असता त्यांनी गोलमोल उत्तर देत याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा उपमुख्यमंत्री अजित दादा हे निर्णय घेऊ शकतात, असे सांगितले. 

 

 
Top