उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या 297 जयंतीनिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती मार्फत आयोजित रक्तदान शिबिरात 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबीराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.धनंजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.नगराध्यक्ष दत्ता बंडगर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.खंडेराव चौरे, डाॅ.संजय सोनटक्के, डाॅ.वाकडे, डाॅ.सुधीर सोनटक्के, राजाभाऊ वैद्य, पांडुरंग लाटे यांची तर इंद्रजित देवकते, प्रा.बालाजी काकडे, बालाजी वगरे, संतोष डुकरे, दिनेश बंडगर, सुधीर बंडगर, सचिन शेंडगे, आकाश नरोटे, नागेश वाघे, समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, सुरेश शिंदे, रवी देवकते, प्रसाद तेरकर, सचिन चौरे, समाधान पडुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या रक्तदान शिबीराच्या यशस्विततेसाठी नरसिंह मेटकरी, प्रा.मनोज डोलारे, संदीप वाघमोडे, नितीन डुकरे, किशोर डुकरे, सुरज तांबे, विकी अंधारे, विजय सोनटक्के, प्रशांत लहाडे, नारायण चव्हाण, धनाजी सलगर, युवराज डुकरे, संतोष वतने, सुधीर थोरात, हिराचंद थोरात, नितीन सलगर, योगेश सलगर व शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीची टीम यांनी परिश्रम घेतले.

अहिल्यादेवींच्या  जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची रुपरेषाही यावेळी मध्यवर्ती जयंती उत्सव समिती मार्फत जाहिर करण्यात  आली. 31 मे रोजी सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौकात प्रतिमा पूजन व अहिल्यादेवी चौकाचे सुशोभीकरणाचे लोकार्पण, दुपारी 1 वाजता शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात कन्यारत्नांचा व त्यांच्या मातापित्यांचा सत्कार तर सायंकाळी 4 वाजता भव्य पारंपरिक सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. 6 जून रोजी सकाळी 10 वाजता शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 12 जून आणि 19 जून रोजी अनुक्रमे घाटंग्री आणि टाकळी (बें.) या गावात सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत मोफत सर्व रोगनिदान व औषधी वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच 26 जून रोजी सकाळी 10 वाजता जत्रा फंक्शन हाॅल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. 

अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी अहिल्यादेवी जन्मोत्सव साजरा होणार असून सर्वांनी सहभागी होवून या जन्मोत्सवाची शोभा वाढवावी  असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.

 
Top