राज्यव्यापी आंदोलनाचा हिंदु जनजागृती समितीचा इशारा 


उस्मानाबाद /प्रतिनिधी-

महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी मंदीरात शासकीय नियंत्रण असतानाही 1991 ते 2009 या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात झालेल्या कोट्यावधी रूपयाच्या अपहार प्रकरणी संबंधीावर त्वरीत गुन्हे दाखल करावेत अन्यथा या प्रश्नी  हिंदु जनजागृती समिती राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशारा शनिवार दि.28 रोजी देण्यात आला. 

जनजागृती समितीच्यावतीने शहरातील मारवाडी गल्लीतील बालाजी मंदीर सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे राजन बुणगे, हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता निलेश सांगोलकर, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री बुणगे म्हणाले की, 1991 ते 2009 या कालावधीत तुळजाभवानी मंदीराचा लिलावात कोट्यावधींचा  अपहार झाल्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने हिंदु विधिज्ञ परिषदेच्या माध्यमातुन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने सदर प्रकरणात गुन्हे अन्वेशन विभागाच्या चौकशी अहवाल सादर करण्यास सांगीतला होता. या अहवालातुन अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. अहवाला नुसार दानपेटी लिलावात आठ कोटी 45 लाख 47 हजाराचा घोटाळा झाला असुन यात 9 लिलावदार, पाच तहसीलदार, एक लेखापरिक्षक, एक धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या सर्वजणावर गुन्हे नोंदवीण्याची शिफारस केली आहे. मात्र हा चौकशी अहवाल 20 सप्टेंबर 2017 रोजी गृह विभागाच्या अप्पर मुखय सचिवाकडे सादर होवुन पाच वर्षे उलटली तरी संबंधीत दोषींवर अद्यापर्यंत कारवाई करण्यात आली नाही. या काळात एका दोषींचे निधन झाले. घोटाळा होवुन 31 वर्षे पुर्ण झाली आहेत. या प्रकरणी सरकार दोषी ठरवलेल्या अधिकार्‍यांना पाठीशी घालत आहे काय असा प्रशन यावेळी उपस्थित करण्यात आला. राज्य सरकार ने प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवुन दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना  अटक करावी त्यांचेकडुन लुटीची रक्कम व्याजासह वसुली करावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा समतिी राज्यव्यापी आंदोलन करेल. आवश्यकता भासल्यास जनहित याचिका दाखल करेल असा इशाारा यावेळी देण्यात आला.

 
Top