उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन नंदगाव ता. तुळजापुर येथे करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात नंदगाव व परिसरातील सर्व वयोगटातील ३४५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.अस्मिताताई कांबळे (मा.जि.प.अध्यक्ष उस्मानाबाद) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे मा.सभापती रेणुकाताई इंगोले तुळजापुर, प.स.सदस्य सिध्दु अण्णा कोरे, सरपंच श्रध्दानंद कालशेट्टी, वैभव पाटील, विश्वजीत घंटे, सागर चौगुले, रहीम शेख, सुरेश जमादार, दत्ता चौगुले, सचिन कोरे, मल्लीनाथ गुड्डे, अप्पा गब्बुरे, कल्याण कुलकर्णी, गजानन पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रास्ताविक प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे यांनी केले.

यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.निलेश युळापुरे, डॉ.जय पटेल, डॉ.सुरज पवार, डॉ.परवीन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओहळ (जनसंपर्क अधिकारी), पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे, तसेच आशा कार्यकर्त्या जयश्री खजुरे, लक्ष्मी कोरे, जयश्री साकलगावकर, ललिता कोळी, सुरेखा निघुडगे, यांनी परीश्रम घेतले.

 
Top