उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील केशेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२१-२२ मधील १८ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संचालक लिंगराज लोकरे यांच्या हस्ते  करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंद गोरे होते. यावेळी अरविंद गोरे यांनी शिल्लक उसाचे मे अखेरपर्यंत गाळप करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे साखर कारखान्यांचे सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अस्वस्थ होऊ नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

 
Top