तुळजापूर / प्रतिनिधी-

मंदीरातुन  बाहेर असणारे अतिक्रमण नगरपरिषद कर्मचारी काढत असताना एकाने   नगरपरिषद कर्मचाऱ्यांना रोखुन  शिवीगाळ करुन मारहाण करुन धमकी  दिल्याची   घटना घडल्याने  नगरपरिषद कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

 या प्रकरणी एका जणाविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिर्थक्षेञ तुळजापूरात दोन्ही मंदीर महाध्दारासमोर २४ तास भाविकांचा ओघ असतो येथे व्यापाऱ्यांचा उत्तम धंदा होतो  येथे दुकानांना  वार्षिक दुकान भाडे  लाखो  रुपयात आहे.

  देवी मंदीर समोरील रस्त्यावरून बाहेर पडण्याचा मार्गावर श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे दुकाने असुन या दुकानांचे लिलाव थांबल्याने या दुकानांन समोर काहीनी रस्त्यावर  अतिक्रमण करुन आपले दुकाने थाटुन व्यवसाय सुरु केला या रस्त्यावरून बाहेर पडताना या अतिक्रमणचा  भाविकांना ञास होत असल्याचा पार्श्वभूमीवर  नगरपरिषद अतिक्रमण विभागाचे कर्मचारी रस्त्यावर असणारे अतिक्रमण काढण्यासाठी तिथे गेले असता अतिक्रमण काढताना  अजय दत्ताञय काकाटे याने  कर्मचाऱ्यांना रोखत  नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन   मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद नगरपरिषद कर्मचारी दत्ता सांळुके यांनी दिलेल्या फिर्याद वरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 
Top