तुळजापूर / प्रतिनिधी-

  हिंदू धर्मात साडेतीन मुहुर्तापैकी एक शुभ  मुहुर्त समजल्या जाणाऱ्या  अक्षयतृतीया दिनी मंगळवार दि.३रोजी  श्रीतुळजाभवानी मातेस संपुर्ण सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते. अक्षयतृतीया पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेस पुरणपोळी, आमरस, नैवध दाखविण्यात आला.

साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असलेल्या अक्षयतृतीया दिनी मंगळवार आल्याने देवीदर्नशनार्थ खास  करुन बंजारा व कर्नाटक सह देशाभरातील भक्तांनी गर्दी केली होती. आज अक्षयतृतीया श्रीबसवेश्वर जयंती ईद सण एकाच दिवशी आल्याने आज प्रत्येक समाजाने आपआपले सण परंपरे नुसार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

अक्षयतृतीया पार्श्वभूमीवर हिंदू धर्मियांनी पुर्वंजाचे फोटोचे पुजन करुन  नैवध दाखवुन पुर्वजांना अभिवादन केले.साडेतीन मुहुर्तापैकी एक शुभमुहुर्त असल्याने आज नागरिकांनी सोने -खरेदी  वाहने इलेक्ट्रॉनिक साधने प्लाॅट खरेदी मोठ्या प्रमाणात केल्याचे वृत्त आहे.


 
Top