उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मातोश्री ग्रामसमृध्दी योजनेतील कामांना अगोदरच मंजुरी मिळाली आहे. मात्र, त्याची अद्याप कार्यारंभाची प्रक्रिया प्रशासनाने केली नाही.  त्याची प्रक्रिया पूर्ण करुन येत्या ९ मे पर्यंत त्याचे कार्यारंभ आदेश द्याव्यात, अशा सूचना आमदार कैलास घाडगे पाटील यानी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

उस्मानाबाद येथे  रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी आमदार पाटील यांनी या सुचना दिल्या. बैठकीला रोहियो उपजिल्हाधिकारी,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहलिसदार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, भूमी उपअधीक्षक अधिकारी, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, तालुक्यातील ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

शेतीला बारमाही रस्‍त्‍याची आवश्‍यकता असल्‍याने विविध योजनांच्‍या अभिसरणाच्‍या माध्‍यमातून रस्‍त्‍याची कामे होणे आवश्यक आहे. त्यामध्ये काही अडचणी असतील त्याची सोडवणुक सामंजस्याने करण्याची सूचना यावेळी आमदार पाटील यानी दिल्या.अगोदरच्या कामे सूरु नसल्याने त्या प्रत्येक कामाची अडचण यावेळी ऐकुन घेण्यात आली. गावातील सरपंच व ग्रामसेवक यानी केलेल्या मागणीचा विचार यावेळी करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या आहेत. मातोश्री ग्रामसमृध्‍दी शेत,पाणंद रस्‍ते योजना राबविण्‍यास मान्‍यता मिळाल्यानंतर तालुक्यामध्ये ९४ कामे मंजुर झाले आहेत. अजुनही अनेक कामाची तांत्रीक मान्यताच झालेली दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक कामाचे प्रस्ताव तयार करण्याची कोणाच्या अंतर्गत ही कामे करायची हे देखील यावेळी ग्रामसेवक व सरपंचाकडुन जाणुन त्यापध्दतीने कामाची रचना करण्यात आली.

 
Top