उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. 25 हजार रुपयांची लाच घेताना तलाठी व कोतवाल यांना अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील अचलेर येथील तलाठी युवराज पवार व कोतवाल प्रभाकर रुपनर यांना अटक करण्यात आली आहे. 30 हजार रुपये लाचेची मागणी करून 25 हजार घेताना रंगेहात अटक केली आहे.

तक्रारदार यांचे वडिलांनी सन 2005 मध्ये घेतलेल्या शेतीचा फेरफार वरिष्ठकडून मंजूर करून देण्यासाठी यापूर्वी 10 हजार रुपये लाच रक्कम स्विकारल्याचे मान्य करून आज रोजी सदर कामासाठीच वरिष्ठकडून फेर फार मंजूर करून देण्यासाठी आणि ऑनलाईन नमुना नंबर 9 ची नोटीस काढण्यासाठी लोकसेवक पवार तलाठी व कोतवाल रुपनूर यांनी तक्रारदार यांना 30 हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोडी अंती 25 हजार रुपये लाच रक्कम पवार यांनी पंचा समक्ष स्वीकारली.

सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांनी काम पाहिले तर सापळा पथकात पोअ इफ्तेकर शेख,शिधेश्र्वर तावसकर ,विष्णु बेळे ,अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांनी काम पाहिले.

 
Top