परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा येथे दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी सोमवार दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता  पवार कॉम्पलेक्स पासून तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चाला प्रारंभ झाला हा मोर्चा महाराष्ट्र राज्य दिव्यांग  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदिप डोके,महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे अधारस्तंभ  व उद्योजक  रामभाऊ पवार  यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला या मोर्चात  महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल शेळके , संघटनेचे सचिव रियाज पठाण तसेच मराठवाडा महिला अध्यक्षा मंगलताई शिंदे ,जिल्हा अध्यक्ष तानाजी घोडके , जिल्हा उपाध्यक्ष दादा गुडे , परंडा तालुका अध्यक्ष पांडुरंग मिसाळ ,शहर अध्यक्ष गोरख देशमाने ,तालुका सचिव सलामत शेख यांच्या वतीने भुम परंडा वाशी या तीनही तालुक्यातील शेकडो अपंग बांधव मोर्चात सहभागी झाले होते. 

या मोर्चामध्ये आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्ची खाली करा महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचा विजय असो अशा घोषणा देत दुपारी १ वाजता तहसिल कार्यालयात मोर्चा धडकला व येथील तहसिलदार रेणुकादास दिवणीकर यांना दिव्यंगाच्या विविध योजनेचे दहा  मागण्या मान्य  करण्याचे निवेदन देण्यात आले.

 हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कर्तव्यदक्ष जिल्हा अध्यक्ष तानाजी घोडके,  संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल शेळके  , तालुका अध्यक्ष पांडुरंग मिसाळ , तालुका सचिव सलामत,  जिल्हा उपाध्यक्ष दादा गुडे यांनी पुढाकार घेतला.


 
Top