उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आयोजित महात्मा फुले लिखित “तृतीय रत्न” नाटक उस्मानाबाद येथे सांस्कृतिक सभागृह आनंदनगर येथे काल दिनांक 22 मे 2022 रोजी सायंकाळी ७ वाजता सादर झाले यावेळी या नाटकाचे उद्घाटन उस्मानाबाद चे तहसीलदार गणेश माळी व जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.

दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर क्रिएटिव्ह हेड प्राध्यापिका संगीता टिपले व प्रकाश योजना शिवप्रसाद गोंड यांच्या माध्यमातून हे नाटक उस्मानाबाद येथे सादर झाले या नाटकास उस्मानाबाद करांनी चांगला प्रतिसाद दिला .

या तृतीय रत्न नाटकामध्ये तेवीस कलाकारांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तृतीय रत्न लिखित पुस्तकाच्या वर्णनातून हे नाटक सादर करण्यात आले या नाटकात “ तृतीय रत्न “ हे महात्मा फुले लिखित नाटक आहे. विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। हे सारे अनर्थ एका अविद्येने केले।। हे अनर्थ दूर करण्यासाठी जोतिराव फुल्यांनी व्रत घेतले शूद्रातिशूद्रांना शिक्षण देण्याचे! ‘शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे’, या सिद्धांतावर जोतीरावांचा पूर्ण विश्वास होता. त्याचबरोबर दलाली आणि मक्तेदारीविरुद्ध बंडखोरी ही त्यांची निष्ठा होती. या कार्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपली वाणी, लेखणी वापरली. प्रत्यक्ष कृतीमधून समाजाला प्रेरणा दिली. मानव्याची आच निर्माण करण्यासाठी माणूस प्रथम जागा केला पाहिजे, या जाणिवेने फुल्यांनी साहित्य निर्माण केले. त्या साहित्य प्रकारात त्यांनी नाटक हा प्रकारसुद्धा वापरला हे सर्व भाव या नाटकातून पाहावयास मिळाले

हे नाटक समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष महादेव माळी माध्यमातून पाहावयास मिळाले हे नाटक यशस्वी करण्यासाठी गौतम शिरसागर, कुणाल निंबाळकर,पृथ्वीराज चिलवंत, सुरज जानराव , अमोल माळी , सोमनाथ गोरे, नितीन माने, दयानंद वाघमारे, विनोद माळी, मुकुंद शिंदे , जयाताई बनसोडे, मीरा खोसे , पल्लवी शिरसागर आदींचे परिश्रम होते

 
Top