उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील मृदंगाचार्य जालिंदर (बप्पा ) सस्ते वारकरी सेवा मंडळ संचलित वारकरी शिक्षण संस्था व संगीत विद्यालयाच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे 10 मे ते 10 जुन या कालावधित मोफत कलात्मक,आध्यात्मीक,स्वावलंबन व स्वयंरोजगार  प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी याशिबीराचा लाभ घेऊ ईच्छुक पालक व विद्यार्थी प्रशिक्षणार्थानी संपर्क साधन्याचे आवाहन संस्थेचे सचिव  महादेव सस्ते यांनी केले आहे .

 शिबीरात संस्थेच्या व्यवस्थापने नुसार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यास प्रवेश दिला जाईल पात्र विद्यार्थ्यांना कलात्मक क्षेत्रातील मृदंग,तबला,संगीत कला या विषयाचे तर आध्यात्मकि क्षेत्रात भजन, किर्तन, हारिपाठ, पारंपारीक खेळीया,भारूड, गीतापाठ या बरोबरच स्वावलंबनात्मकतेचे धडे व स्वयंरोजगार म्हणुन बेसीक काँप्युटर प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी इच्छुकांनी आपली नोंदणी लवकरात लवकर करुन ध्यावी आसे अवाहन ही  संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे .

 

 
Top