उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा  शासकीय वृद्ध कलावंत मानधन समितीच्या अध्यक्षपदी कळंब तालुक्यातील सातेफळ येथील बाबासाहेब उगले यांची निवड झाली आसुन बाबासाहेब उगले यांनी गायन,किर्तन क्षेत्रात आपली कला  संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊन 

कला सादर केली त्याच प्रमाणे ते अखिल भाविक वारकरी मंडळाच्या कळंब तालुक्याचे आध्यक्ष म्हणुन कार्य पहात आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र आभिनंदन होत असून वृद्ध कलावंतांचे गेली अनेक वर्षापासून धूळखात पडलेल्या फाईली निकाली   निघण्याचा मार्ग  मोकळा झाला आहे गेली अनेक वर्षापासून दाखल करून असलेल्या  वृद्ध कलावंतांना न्याय ही मिळणार आहे .

 
Top