उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार नियमबाह्य भोंगे उतरविणे व नियमाप्रमाणे आवाजाच्या मर्यादेचे पालन करा म्हणणाऱ्या महाराष्ट्र सौनिकास पोलीस प्रशासनाला दबावात घेऊन त्यांची मुस्कटदाबी करणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी निर्दशने आंदोलनास परवानगी मिळणे बाबतच्या मागणीचे निवेदन अनंदनगर पोलिसांना मनसेच्या वतीने देण्यात आले आहे. 

  नियमबाह्य पध्दतीने अटी टाकून हिंदूजननायक मा. राजसाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगर येथील सभेला परवानगी देणाज्या व अटीचा भंग केला म्हणून हिंदूजननायक मा. राजसाहेब ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या व सुप्रीम कोटाने दिलेल्या आदेशानुसार, विनापरवानगी मस्जिदीवरील भोंगे काढणे व भोंग्याबाबत आवाजाच्या मर्यादेचे पालन करा म्हणणाऱ्या महाराष्ट्र सौनिकांना पोलीस प्रशासनावर दबाव टाकून त्यांची मुस्कटदाबी करणाज्या आघाडी सरकारच्या विरोधात उद्या दि. 05/05/2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उस्मानाबाद तालुक्याच्या वतीने निर्दशने करण्यात येणार आहेत. या  आंदोलनास परवानगी देण्यात यावी अशी मागणी मनसे उस्मानाबाद शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण, तहसीलाध्यक्ष पाशाभाई शेख यांनी केले आहे. 

 
Top