उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तेरणा लवकरात लवकर सुरू व्हावा या मागणीसाठी तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१२ ते २०२२ गेल्या १० वर्षीपासून तेरणा कारखाना बंद आहे २०२१ ला तेरणा बचाव संघर्ष समितीने आंदोलन केले होते जिल्हा मध्यवर्ती बँकेने मार्ग काढून २५ नोव्हेंबर २०२१ हा कारखाना भाडेतत्त्वावर दिला होता पण २१ शुगर्स लातूर व भैरवनाथ शुगर सोनारी यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले गेल्या ६ महिन्यांपासून हे प्रकरण या न्यायालयातून त्या न्यायालयात चालू आहे तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या दोन संस्थांमध्ये मध्ये तडजोड करून तेरणा चालू करावा व तेरणा परिसरातील शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबावी अन्यथा ४ जून रोजी तेरणा साखर कारखान्यासमोर शेतकरी व कर्मचारी आत्मदहन करणार आहेत या निवेदनावर अनिल कोकाटे, सुनिल समुद्रे,शहाजी शिंदे, श्रीकांत परीट,बबलू सिरसिर, शशिकांत देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.