तुळजापूर / प्रतिनिधी-

कंचेश्वर शुगर लि मंगरुळ ने चालू  गळीत हंगामात कारखान्याने ६५७ ९ २ ९ .८ ९ ६ मे.टन असे कारखाना इतिहासात प्रथमच विक्रमी गाळप सर्वांच्या सहकार्याने शक्य झाल्याचे सांगुन आपल्याकडे आसवणी प्रकल्प व सहवीज निर्मिती प्रकल्प असल्यामुळे भविष्यात चांगले दिवस येतील असे प्रतिपादन चेअरमन धनंजयजी भोसले यांनी केले 

तालुक्यातील मंगरुळ .येथील.  कंचेश्वर शुगर लि.मंगरुळ ता . तुळजापुर जि . उस्मानाबाद या कारखान्याचा सांगता समारंभ कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.श्री . दिलीपराव माने साहेब व विद्यमान चेअरमन मा . श्री . धनंजय ( भैय्या ) भोसले तसेच सर्व ऊस उत्पादक शेतकरी , तोडणी वाहतुक ठेकेदार व कर्मचारी कामगार यांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला .यावेळी ते बोलत होते. 

 यावेळी सांगता समारंभाची   पुजा   पृथ्वीराज दिलीप माने यांचे शुभ हस्ते करण्यात आली . कार्यक्रमावेळी ज्या ऊस तोडणी / वाहतुक ठेकेदारांची जास्तीत जास्त ऊसाचा पुरवठा केला आहे अशा ठेकेदारांचा बक्षीस देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला   कार्यक्रमावेळी सर्व ऊस तोडणी / वाहतुक ठेकेदार व कर्मचाऱ्यांना स्नेह भोजन देण्यात आले . कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . संजीवकुमार एस . जाधव यांनी सर्वांचे आभार मानले . या प्रसंगी सर्व खातेप्रमुख , कर्मचारी व ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 
Top