उमरगा  / प्रतिनिधी-

 उमरगा नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित विविध मागण्या साठी पालिकेसमोर  सोमवार ( दि दोन) मे पासून बेमुदत आंदोलनास सुरवात केली आहे. पालिकेचे मुख्याधिकारीकांऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्यातील नगर पालिका, नगर पंचायती मधील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नाबाबत  सरकारचे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्यामुळे राज्य संघनेच्या आदेशानुसार  सोमवार पासून आंदोलन करीत आहेत.

राज्यातील नगर पालिका, नगर पंचायती मधील कर्मचाऱ्यांचे 100 टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कोषागारा मार्फत करण्यात यावे, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी तात्काळ देण्यात यावी, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तात्काळ अदा करावी, उदघोषणा पूर्वीचे वं नंतर चें कर्मचाऱ्यांचे सर सकट समावेशन करावे, सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे बांधून द्यावे, घन कचऱ्याची ठेका पद्धत बंद करून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, अश्या 26 मागण्याचे निवेदन देण्यात आले असून 

या निवेदनावर  तुळशीदास वऱ्हाडे,शेषराव भोसले, करबस शिरगुरे, मंजूर शेख,शिवशंकर मोरे, परमेश्वर सौन्दगे, संतोष कांबळे, गणेश सरपे, बालाजी जाधव, गणेश सरपे, माधव नागराळे, बाळू माने, उद्धव कांबळे, सूरज भवनालकर, धोंडाबाई घोडके, विमलबाई बनसोडे, शांताबाई कांबळे, कांताबाई गायकवाड,इंदूबाई लोकरे, कंत्राटी कर्मचारी विठ्ठल ओव्हाळ, चांदपाशा बाणकर, लखन चव्हाण,आदीच्या सह्या आहेत.

 
Top