उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि उस्मानाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्स प्रशिक्षण केंद्रात उन्हाळी अॅथलेटिक्स (मैदानी) क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अॅथलेटिक्स (मैदानी) हा एक मान्यताप्राप्त ऑलिम्पिक क्रीडा प्रकार आहे. शालेय स्तरापासून विद्यापीठ व ऑलिम्पिक स्तरापर्यंत हा क्रीडा प्रकार खेळला जातो. 

बुधवार पासून प्रारंभ होणारे हे शिबिर 4 मे ते 20 मे 2022 दरम्यान आयोजीले आहे. 5 ते 14 वर्ष वयोगटातील मुले व मुलींसाठी शिबिर असणार असून तज्ञ मार्गदर्शक मार्फत तंत्रशुद्ध अॅथलेटिक्स (मैदानी ) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिबिरात प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक  योगेश थोरबोले मो. नं. 9860609056, मुख्य प्रशिक्षक माऊली भुतेकर मो न.9404193674 यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त मुल मुलींनी शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अॅथलेटिक्स (मैदानी) संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप आणि जिल्हा क्रीडा अधिकारी मिरा रायबान यांनी केले आहे.


 
Top