उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शिक्षणतज्ञ एम.डी.देशमुख यांनी लिहिलेल्या वादळवाट या त्यांच्या आत्मचरित्रातुन त्यांच्या व्यक्तीचरित्राची ओळख तर झालीच पण त्याचवेळी त्यानी भाई उध्दवराव पाटील यांच्याबद्दल लिहलेल्या अनेक गोष्टी या नव्याने समाजासमोर आणल्याने ते त्यांच्याही व्यक्तीचरित्राचा भाग असल्याचा उल्लेख प्रा.इंद्रजित भालेराव यांनी केला.यापेक्षा अधिक चांगले भाई उध्दवराव पाटील या अगोदर कुठेही वाचायला मिळाले नसल्याचे त्यानी आवर्जुन सांगितले. . 

वादळवाट आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याप्रसंगी श्री.भालेराव बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.यशवंत पाटणे,आमदार कैलास घाडगे पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,जेष्ट नेते जीवनराव गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,भाई धनंजय पाटील,शशिकला घोगरे,उषा देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री.भालेराव म्हणाले की,एम.डी.देशमुख यांनी आत्मचरित्र लिहताना ते स्वकेंद्री होऊ दिलेले नाही हे त्याचे वैशिष्ट्य आहे,तत्कालिन परिस्थितीमध्ये काळात असलेल्या चांगल्या व वाईट गोष्टीचे एकप्रकारे समीक्षण करुन त्यावर स्वतःचे मत मांडले आहे.एम.डी.देशमुख यांच्यावर भाई उध्दवराव पाटील यांचा विशेष प्रभाव असल्याचे या चरित्रामुळे लक्षात येते, त्यामुळेच त्यानी भाई उध्दवराव यांच्याबद्दल जे लिहले आहे, ते संदर्भ या अगोदर कुठेही वाचायला मिळाले नसल्याचे सांगुन नरसिंग देशमुख काटीकर, बी.एन.देशमुख आदी शेकापच्या नेत्यांबद्दल देखील त्यानी या चरित्रात भरभरुन लिहल्याचे श्री. भालेराव यानी सांगितले.

यावेळी डॉ.पाटणे म्हणाले की,आत्मचरित्र लिहताना आपल्या सोयीचा लिहण्याचा प्रघात हल्ली सूरु झालेला त्यामध्ये आपल्याविषयीचे सत्य मांडण्याचे धाडस कोण करत नाही.पण एम.डी.देशमुख यांनी यामध्ये आपल्याबाबतचा सगळ्या सत्य घटनाचा उल्लेख यामध्ये आवर्जुन केल्याचे त्यानी यावेळी सांगितले.

आमदार पाटील यांनी सांगितले की, या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी आमदार म्हणुन नाही तर सरांचा एक विद्यार्थी हजर असल्याचे सूरुवातीलाच सांगितले. शिक्षण अनेकजण देतात पण त्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थी संस्काराक्षम असले पाहिजेत हा एम.डी.देशमुख यांचा महत्वाचा गुण होता. त्यामुळेच या शाळेतुन शिकुन गेलेल्या अनेक पिढ्यापर्यंत संस्कार पोहचल्याचेही आमदार पाटील यानी सांगितले. माझ्यासह सर्वच विद्यार्थ्यांच्या घरात जाऊन त्या विद्यार्थ्याचे घरातील वर्तन तपासुन त्यांच्यात बदल घ़डवुन आणणारे गूरु म्हणुन एम.डी.देशमुख हे होते. जिल्ह्यातील उत्तुंग व्यक्तीमत्व असलेले भाई उध्दवराव पाटील यांना आम्ही पाहिले नाही, पण एम.डी.देशमुख यांच्यातुनच आम्ही भाईना पाहत असल्याचे आमदार पाटील यानी सांगितले. 

 
Top