उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दि. 12 मे 2022 रोजी  मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली वन विभाग व सामाजिक वनीकरण, जिल्हा कृषी विभाग,  भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उस्मानाबाद यांची अटल भूजल योजने अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये अभिसरणामधून वृक्ष लागवड मोहीमेची नियोजन याबाबत बैठक बैठक घेण्यात आली.

   यावेळी  विभागीय वन अधिकारी,  वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा जिल्हा परिषद, गट विकास अधिकारी पंचायत समिती उस्मानाबाद,उमरगा उपस्थित होते.

 याबैठकी दरम्यान ज्या ठिकाणी डोंगर टेकडया आहेत अश्या ठिकाणी माथा ते पायथा वनविभागाच्या जागेत, वन विभाग व इतर ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत अभिसरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याच्या सूचना श्री. गुप्ता यांनी दिल्या.  खडकाळ ठिकाणी तळी किंवा पाण्याची टाकी निर्माण करून (गेटेड तयार करुन खालील भागातील व पाईपलाईनद्वारे तोटीने शेतकर्याना वृक्ष संगोपन करिता पाणी देता येऊ शकते.

  अटल भूजल योजनेअंतर्गत समाविष्ट गावांमध्ये करावयाची समपातळी चर (CCT) खोल सलग समपातळी चर (DEEP CCT) कामे व वृक्ष लागवड मोहीम आणि पुरवठा / मागणी आधारित सर्व प्रकारच्या, स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा. यात शोषखडडे विहिर पुनर्भरण, रेन वॉटर हर्वेस्टींग, स्त्रोत बळकटीकरण करणे (JJM) तसेच कोरडवाहू फळबाग लागवड, प्लॉस्टिक मल्चिंग मुरघास इ. कामांचा समावेश करण्यात यावा. अभिसरंणांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतकरिता अंदाजे 1 ते 1.5 कोटींचा कार्यक्रम जलसुरक्षा आराखडयात समावेश असणे अभिप्रेत आहे. हे अभिसरण जास्तीत जास्त रोहयो योजनेतुन कराव्यात अशी सुचना देणेत आली. या प्रमाणे विविध विभागाअंतर्गत स्थानिक परिस्थतीनुसार उपलब्ध साधन साम्रगीचा उपयोग करण्यात यावा. अशा सुचनाही श्री.गुप्ता यांनी संबंधित विभागांना दिल्या.

 
Top