उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, येथे कार्यालयाची सुरक्षा रक्षकाची आवश्यकता आहे.तसेच कार्यालय लोकाभिमुख असल्याने वाहनधारकाची रेलचेल असते त्याकरिता स्वच्छता करण्यासाठी एक स्वच्छकाची कार्यालयास आवश्यकता आहे.

 सेवापुरवठादाराच्या कराराचा कालावधी हा एक वर्षाकरिता असेल,सदर संस्थेची,सेवापुरवठादाराची जबाबदारी ही शासकीय मालमत्तेचे रक्षण करण्याची असेल शासकीय मालमत्तेस हानी पोहचल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार हा सेवापुरवठादार,संस्था असणार आहे,सेवापुरवठादार,संस्था ज्यांची निविदा न्युनत्तन असेल अशा सेवापुरवठादारास सुरक्षा रक्षकाचे काम देण्यात येईल,सेवापुरवठादार,संस्था यांचे सुरक्षा रक्षकाचे,स्वच्छतेचे काम समाधानकारक दिसून न आल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता सेवा समाप्तीचे आदेश देण्यात येतील,सेवा पुरवठादार,संस्था यांची निविदा ही सर्व करासह असणे बंधनकारक आहे,सेवा पुरवठामार्फत काम करणाऱ्या कर्मचारी यांच्या सेवेचे कोणतेही उत्तरदायित्व कार्यालयावर असणार नाही,सेवा पुरवठादाराकडे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा अभिकरणे(विनियमन) नियम-2007 नुसार सुरक्षा रक्षकाचा व्यवसाय करण्याची अनुज्ञप्ती असणे आवश्यक आहे, सेवा पुरवठादार महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सुरक्षा एजन्सी व्यवसायात गुतण्यासाठीचा परवाना धारण केलेला असलेला पाहिजे, दि.22 मे 2022 पुर्वी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

 
Top