उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कलाविष्कार अकादमी उस्मानाबाद यांच्या वतीने केलेल्या आवाहनानुसार जेष्ठ साहित्यिक कै.श.मा. पाटील यांच्या नांवे साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय लिखानासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार साठी राज्यभरातून मोठ्या संख्येने साहित्य कृती प्राप्त झाल्या होत्या.  तज्ञ परिक्षकांकडून परिक्षण करून त्यापैकी ‘अविनाश पासष्टी’ या गझल संग्रहाची निवड पुरस्कार साठी करण्यात आली आहे.

सदरच्या गझलसंग्रहाचे लेखक पुणे येथील प्राचार्य डॉ .अविनाश सांगोलेकर हे कविवर्य सुरेश भट यांचे सोबत “काफला” या  प्रातिनिधिक मराठी गझल संग्रहाचे संपादन करणारे व मराठी गझल चे आद्यसंशोधक म्हणून ओळखले जातात. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे प्राचार्य तथा मराठी विभाग प्रमुख राहिले असून प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या “अविनाश पासष्टी” या गझलसंग्रहाची निवड कलाविष्कार अकादमी तर्फे देण्यात येणा-या कै.श.मा.पाटील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. लवकरच हा पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते समारंभ  पूर्वक प्रदान करण्यात येणार असून रोख रक्कम , सन्मान चिन्ह , सन्मान पत्र , शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप   असणार आहे असे कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष युवराज नळे उपाध्यक्ष ॲड. राज कुलकर्णी सचिव शेषनाथ वाघ व कार्यकारिणी मंडळाने जाहीर केले आहे .

 
Top