उस्मानाबाद / प्रतिनिधी

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित,रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी व ऑप्टीमल स्किल्स अॅन्ड सोल्युशन फाउंडेशन कंपनी हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय कौशल्य विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची आज सांगता करण्यात आली.

  या शिबिरामध्ये तीस दिवस विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्यासाठी चे प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट आणि वेगवेगळे संगणकाचे कोर्सेस यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात महाविद्यालयातील 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे, संगणकाचे ज्ञान असावे आणि त्याचा व्यक्तिमत्व विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी नावीन्यपुर्ण संकल्पना मांडून स्पर्धा परीक्षा विभागाला मार्गदर्शन केले व महाराष्ट्रातील पहिला पायलट प्रोग्राम या महाविद्यालयात यशस्वी रित्या पार पडला. या तीस दिवसीय शिबिरात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धापरीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी व आप्टीमल कंपनीचे समन्वयक श्री प्रमोद पवार यांनी मोलाची भूमिका पार पाडली या तीस दिवसीय शिबिरात दररोजच्या प्रशिक्षणाबरोबरच वेगवेगळ्या स्वरूपाची व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांचे उद्योजकता विकास, व्यक्तिमत्व विकास इत्यादी बाबत प्रबोधन करण्यात आले. आज या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात कंपनीचे अधिकारी पवन सर आणि राधाकिशन सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ.मारुती लोंढे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. विकास भोवाळ यांनी केले तर आभार कंपनीचे समन्वयक श्री प्रमोद पवार यांनी मानले याप्रसंगी या तीस दिवसीय प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षक म्हणून प्रा. विकास भोवाळ डॉ.लक्ष्मण भरगंडेआणि प्रा.प्रमोद उमाटे यांनी परिश्रम घेतले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारचे शिबिर वारंवार घेण्यात यावेत अशा स्वरूपाची विनंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांना केली याप्रसंगी डॉ.लक्ष्मण भरगंडे आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

 
Top