कळंब  / प्रतिनिधी-

शहरातील कथले चौक परिसरात स्व.गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.यामध्ये नारळ,बदाम,कांचन,रातराणी,वड आदी झाडे लावण्यात आली.पावसाळा सुरू होण्यापूर्वी या परीसरात झाडे लावुन ते संगोपन करण्याच्या दृष्टीने झाडांना जाळ्या लावण्यात आल्या आहेत.

कथले आघाडीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात तसेच वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळुन वृक्ष भेट देण्याचा देखली उपक्रम अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे.हभप महादेव महाराज आडसुळ यांच्या हस्ते परीसरात जवळपास 15 वृक्ष लावण्यात आले यावेळी पञकार माधवसिंग राजपुत,विलास मिटकरी,नाना शिंगणापूरे,काझी, पञकार बालाजी सुरवसे,सचिन क्षिरसागर,संदीप कोकाटे,अक्षय मुळीक यांच्यासह कथले आघाडीचे बाळासाहेब कथले,सुमीत बलदोटा,भाऊसाहेब शिंदे,अशोक फल्ले,यश सुराणा,प्रकाश खामकर,मनोज फल्ले,बालाजी खैरमोडे,विश्वजित पुरी,धर्मराज पुरी,संतोष काळे आदी उपस्थित होते.


 
Top