उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रुपामाता परिवाराने सामाजिक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत विश्वरुपा नवचैतन्य आनंदआश्रमाची नोंदणी केली आहे. अवघ्या दोन दिवसात सदरील नोंदणीचे प्रमाणपत्र सहायक धर्मादाय आयुक्तांकडून मिळालेले असून लवकरच ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत वृद्धाश्रम दाखल होत असल्याची माहिती रुपामाता परिवारचे संस्थापक अ‍ॅड.व्यंकटराव गुंड यांनी दिली.

 रुपामाता उद्योग समूहाचा लौकीक केवळ उस्मानाबादच नव्हे तर शेजारील लातूर, बीड जिल्ह्यातही वाढला आहे. रुपामाता मल्टीस्टेट, रुपामाता अर्बन बँक, रुपामाता नॅचरल शुगर, रुपामाता डेअरी, रुपामाता विद्यालय अशा  संस्थांच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये आज रुपामाता समूहाने आता वृद्धांची सुश्रुषा करण्यासाठी विश्वरुपा नवचैतन्य आनंदआश्रमाची निर्मिती केली आहे. रुपामाता परिवारचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. गुंड यांच्या संकल्पनेतून लवकरच भव्यदिव्य वृद्धाश्रम सुरू होत असल्याने आजच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबापासून दुरावलेल्या, एकटे राहणार्‍या वृद्धांना मायेचे पांघरुण विश्वरुपा नवचैतन्य आनंदआश्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे.

 विश्वरुपा नवचैतन्य आनंदआश्रमाच्या नोंदणीसाठी दोन दिवसांपूर्वीच रुपामाता परिवारचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. व्यंकटराव गुंड यांनी प्रस्ताव दाखल केला होता. अ‍ॅड.गुंड यांच्या सामाजिक कार्याची ओळख असलेल्या सहायक धर्मादाय आयुक्त संजय पुंडलिक पाईकराव यांनी दोन दिवसांतच  सदरील नोंदणीचे प्रमाणपत्र देऊन रूपामाता परिवाराला सामाजिक कार्यात प्रोत्साहित केले आहे. दोन दिवसातच विश्वरुपा नवचैतन्य आनंदआश्रमाचे नोंदणी प्रमाणपत्र दिल्याबद्दल रुपामाता परिवारच्या वतीने अ‍ॅड. गुंड यांनी सहायक धर्मादाय आयुक्त यांचे आभार व्यक्त केले.

 त्यामुळे रुपामाता परिवाराचे आता सामाजिक क्षेत्रातील हे नवे पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे. नोंदणी प्रमाणपत्र देतेवेळी सहायक धर्मादाय आयुक्त संजय पुंडलिकराव पाईकराव, निरीक्षक राम निवृत्ती ढेरे, लघुलेखक राजेश नारायण कणकी, वरिष्ठ लिपिक त्र्यंबक म्हेत्रे, अ‍ॅड.दिगंबर खोत, अ‍ॅड.अरुणा गवई आदी उपस्थित होते.

 
Top