तेर /प्रतिनिधी

“वारसा संतांचा, अंधश्रद्धा निर्मूलनचा ‘या घोषवाक्यनी  महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा  निर्मूलन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जनप्रबोधन यात्रेचे  तेरमध्ये 22 मे ला आगमन झाले.यावेळी तेर मध्ये  ग्रामस्थ, ग्रामसेवा संघ , आर्ट ऑफ लिविंग च्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. समितीच्या सदस्यांनी  श्री. संत गोरोबा काका मंदिरामध्ये दर्शन घेतले.नंतर  जुने बस स्थानक येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान राज्य प्रधान सचिव  माधव बावगे यांनी उपस्थित ग्रामस्थांना अंधश्रद्धा निर्मूलन, अनिष्ट चालीरीती,परंपरा इत्यादी संबंधी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक   मनोहर जायभाये यांनी केले तर आभार  तानाजी पिंपळे यांनी मानले.

यावेळी  बालाजी भक्ते,  नवनाथ पांचाळ , सचिन करणावर , माधव मगर,  नामदेव थोडसरे, केशव मुळे  व  नागरिक उपस्थित होते.


 
Top