तुळजापूर / प्रतिनिधी- 

तालुक्यातील बारुळ येथे बहिणीस का ञास देतो म्हणून झालेली  शाब्दीक चकमक वाढुन एकाने पिस्तूल मधुन गोळी झाडल्याने यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.२०रोजी दुपारी साडेचार वाजण्याचा सुमारास घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन  जखमीस सोलापूर येथील रुग्णालयात  उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, बारुळ (ता तुळजापूर) येथे    आरोपीने त्याच्या बहिणीस फिर्यादीचे घरचे ञास का देतात या कारणावरून अंदाजे दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे घरी बारूळ येथे येवुन वाद घालीत असताना फिर्यादीचा पुतन्या हा त्याच्या वडीलांची बाजु घेत असल्याने त्याचा मामा भाग्यवान लक्ष्मण गायकवाड (रा. चिकुंद्रा ता. तुळजापुर) यानें भाचा सार्थक याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर त्याने आणलेल्या पिस्टलमधुन गोळी मारली. त्यावेळी फिर्यादीच्या पुतन्याने त्याचा डावा हात वर केल्याने त्याच्या डाव्या हाताच्या कोप - याच्या खाली पिस्टलची गोळी लागुन गंभीर दुखापत होवुन रक्त स्ञाव होत असल्याने त्यास सरकारी दवाखाना तुळजापुर येथे उपचारास घेवुन येवुन प्राथमीक उपचारानंतर स.द. उस्मानाबाद व तेथुन आश्विनी हाँस्पीटल सोलापुर येथे दाखल केले असून त्याचेवर उपचार चालु आहेत 

या प्रकरणी दिंगबर बळी मस्के (रा. बारुळ) याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी भाग्यवान  लक्ष्मन गायकवाड (रा. चिकुंद्रा ता .तुळजापूर) याचा विरोधात गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास सपोनि कांबळे हे करीत आहेत,


 
Top