उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील सांस्कृतिक सभागृहात राज्य शासनाच्या नागपूर येथील महात्मा जोतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था (महाज्योती ) यांच्यावतीने दि. 22 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता महात्मा जोतिबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील सांस्कृतिक सभागृहात (बी.एण्ड सी.क्वार्टर मधील) करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे.                              

महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत समाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे, या हेतूने  इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, श्री. लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून त्यांच्यासह 30 कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. याआधी विविध जिल्ह्यात दहा प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. या नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक भाप्रसे प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे.


 
Top