कळंब  / प्रतिनिधी-

कळंब शहरातील  पारधी पिढी येथील पारधी समाजातील ६ते१४वयोगटातील ६० मुले शिक्षणापासून वंचित आहेत त्यांची तात्काळ सोय करावी अशी मागणी लाल पॅंथर संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहेत कि,कळंब शहरात पारधी समाजाची कुटुंब संख्या ५००च्या जवळपास असुन ६ते१४वयोगटातील मुले शिक्षणापासून वंचित असुन त्यांना तात्काळ वसतिगृहात प्रवेश देऊन शिक्षणाची सोय करण्यात यावी.तसेच ०ते६ वयोगटातील मुला मुलींना पुर्व प्राथमीक शिक्षण व आरोग्य सेवा मिळत नाही.त्यामूळे त्यांनाही मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात सदरील मुले ही उमरगा येथील वसतिगृहात शिक्षण घेत होती, परंतु वस वस्तीगृह बंद पडले असल्याने जानेवारी २०२२पासुन या मुलांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या जुन महिन्यात तरी या विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रश्न मिटवावा अन्यथा सदरील मुले ही भविष्यात चोर,दरोडेखोर, गुन्हेगारी प्रवृत्तीचे होतील? असे निवेदनात म्हटले आहे.सदरील निवेदनावर लाल पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे, मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे, जिल्हाध्यक्ष माया शिंदे, नगरसेवक सुभाष पवार,बाबुशा पवार,भारत कदम,गौतम हजारे,बजरंग धावारे,अरुण कांबळे,पोपट पवार, सुनिल ताटे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top