उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशन व कृषी विभाग उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण शिबिर पार पडले या कार्यक्रमात महेशकुमार तिर्थकर जिल्हा कृषी अधीक्षक ए ए काशीद कृषी उपसंचालक चेतन जाधव डॉ डी जी मोरे डॉ वसंत सूर्यवंशी शास्त्रज्ञ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ या मान्यवरांचे मार्गदर्शन झाले सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती सर्व कृषी अधिकारी उपस्थित होते

दुपारच्या सत्रात उस्मानाबाद जिल्हा संघटनेचे वार्षिक संमेलन पार पडले त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ऍग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन नवी दिल्ली मनमोहनजी कलंत्री यांनी मार्गदर्शन केले माफदा संघटनेचे सत्यनारायण कासट बालाजी चौगुले सोलापूर तसेच उस्मानाबाद जिल्हा संघटनेचे माजी अध्यक्ष उत्कर्ष संगवे नूतन अध्यक्ष विठ्ठल बदोले सचिव उदय तीर्थकर यांचे कृषी निविष्ठा क्षेत्रातील अडचणी केंद्र शासन व राज्य शासन स्तरावर राष्ट्रीय व राज्य संघटनेने केलेले प्रयत्न या विषयावर चर्चा झाली

सदर कार्यक्रमास  जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रसेन पिसाळ अजित शर्मा संजय मोजणी अभिजित थिटे संग्राम शिंदे इत्यादी डीलरसनी मोलाची मदत केली

 
Top