उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील जागर फाउंडेशन या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या उन्हाळी छंद वर्ग शिबिर 2022 ची यशस्वी सांगता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून करण्यात आली. 

मागील दोन वर्षांमध्ये कोरोना च्या पार्श्वभूमी मुळे लागलेल्या लॉकडाऊन मुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले होते, तसेच ऑनलाइन शाळा असल्याने विद्यार्थ्याच्या इतर कला गुणांना कसलाच वाव भेटला नव्हता. हे लक्षात घेवून विद्यार्थांसाठी सदैव वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या  जागर फाउंडेशन या सामाजिक संस्थेने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उन्हाळी छंद वर्ग शिबिराचे आयोजन केले होते.   मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना हॉर्स रायडिंग,योग प्रशिक्षण,शारीरिक कसरत,नृत्य,चित्रकला,शिल्पकला,सुंदर हस्ताक्षर,पथनाट्य, नाटक ,बासरी वादन अश्या विविध कलांचे प्रशिक्षण देण्यात आले,तसेच समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी शिकलेल्या कलेचे सादरीकरण चित्रकला प्रदर्शन,नाटक- (करप्शन ची वारी स्वर्गाच्या दारी) पथनाट्य-(ऑनलाईन शिक्षणाच्या आईचा घो), तसेच शिवराज्यभिषेक सोहळा गीत, खंडोबा ची कारभारीन, जोतिबा गीत, परम सुंदरी अश्या विविध गीतांवर नृत्य  सादरीकरण करण्यात आले.                                                                                                                                                    

या शिबिरामध्ये विद्यार्थांना प्रशिक्षण देण्यासाठी नाट्य विभागाचे प्रा.सोहन कांबळे ,नकाते सर,गणेश शिंदे सर,नृत्य प्रशिक्षक ऐश्वर्या शिंगाडे, दीपक राठोड,अंकिता राठोड,टोले सर, चित्रकला विभाग नानासाहेब बोराडे सर ,पांचाळ सर, भोसले सर,रवी तिगडे सर,श्रीमंत सुरवसे सर,तसेच क्रीडा मार्गदर्शक योगेश थोरबोले व सहकरी,योग प्रशिक्षक नंदकुमार तांबडे यांचे मार्गदर्शन लाभले.                                                                                                                                 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जागर जागर फाउंडेशन चे सर्व सदस्य शितल देशमुख सर ,श्रीकांत जाधव,मुकुंद घाटगे, निलेश बागल,गणेश गळकाटे,डॉ आनंद देशमुख तसेच  फ्युचर सायकल चे प्रदीप खामकर,उद्योजक संग्रम शिंदे,गणेश बुद्रुक,दादा हजारे,शैलेश आवारे,बंटी भोसले डॉ .दयानंद चौरे,मनोज डोलारे,प्रदीप गाडे, सनराइज् इंग्लिश स्कूलचे कात्रे सर, विजय यादव, सुरवसे मॅडम, यांचेही विशेष सहकार्य लाभले

 
Top