तेर / प्रतिनिधी- 

वाणेवाडी ता. उस्मानाबाद येथे केशर आंबा लागवड तंत्रज्ञान व निर्यातक्षम आंबा उत्पादन याविषयी कृषी विभागामार्फत कार्यशाळा घेण्यात आली.                                                   

यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ भगवानराव कापसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना निर्यातक्षम आंबा  लागवड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच गणेश मंडलिक, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र ,तुळजापूर. यांनी  केशर आंबा लागवड तंत्रज्ञान करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. महेश तीर्थकर यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत विविध योजनेविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता प्रगतशील शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे, बाळासाहेब वाघ, काकासाहेब उंबरे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता वैभव उंबरे, तुळजाई फॉर्म चे संस्थापक बाळासाहेब बिक्कड, कृषी सहाय्यक वैभव लेनेकर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी लातूर चे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, उस्मानाबाद तालुका कृषी अधिकारी . डी .आर. जाधव, कळंब तालुका कृषी अधिकारी बी.बी.जाधव, तेरचे मंडळ कृषी अधिकारी  सत्यजित देशमुख,शिराढोण चे मंडळ कृषी अधिकारी भुजंग लोकरे,येरमाळा चे  मंडळ कृषी अधिकारी  विनोद माळी .कृषी सहाय्यक रविकांत आडसूळ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top