उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या विरोधात समाज माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या सिने अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर रोहित बागल यांच्या फिर्यादीवरुन उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चितळे यांच्या पोस्टमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांचा निषेध केला आहे. उस्मानाबाद येथेही विविध कार्यकर्त्यांनी चितळे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.


 
Top