उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व अभिजीत लोके यांच्या वाढदिवसानिमीत्त सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन अपसिंगा ता. तुळजापुर येथ करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात अपसिंगा व परिसरातील सर्व वयोगटातील ३४० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन सज्जन साळुंके (तुळजाभवानी पूजारी मंडळ अध्यक्ष तुळजापुर) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे राजू काका गोरे (सरपंच), महेश गोरे (माजी पं.स.सदस्य), रामदास गोरे (माजी सरपंच), अजित क्षीरसागर (ग्रा.प.सदस्य), दिपक सोनवणे (उपसरपंच), अभिजीत लाके, सचिन जाधव (ग्रा.पं.सदस्य), श्रीमंत क्षीरसागर, युवराज पाटील (पोलीस पाटील), समाधान रोकडे (कामठा), सुजित जमदाडे, प्रशांत गोरे, श्रीकृष्ण काळे, धनंजय भोसले, मिटु सरडे, गोकुळ खडके, किरण माळी, वैजनाथ गोरे, दिनेश गोरे, ऋषीकेश पाटील, श्रीनाथ नकाते, ज्ञानेश्वर जमदाडे, लक्ष्मीकांत तोडकरी, गणेश बामणे, राहुल गोरे, सतीश तोडकर, इराप्पा तोडकरी, दत्ता आडसकर, प्रशांत साळुंके, दिपक जठार, सुरज गुख, आपसिंगा आरोग्य केंद्राचे डॉ. सुरेश माळी (MPW), आशाताई एस.एस.सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रास्ताविक प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे यांनी केले.

 यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.अक्षय बहीर, डॉ.आकाश बहीर, डॉ.शुभम सिंगटकर, डॉ.आशिष पुरोहीत, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओहळ (जनसंपर्क अधिकारी), पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे, यांनी परीश्रम घेतले.


 
Top