उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ग्रामीण भागाला स्व च्‍छ, मुबलक पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबवली जात आहे. ज्या गावांची पाणी योजना जुनी, अपुरी व खराब झाली आहे किंवा एकही योजना नाही त्याठिकाणी नव्याने पाणी योजना घेतली जाणार आहे.  या योजनांचे सर्वेक्षण,अंदाजपत्रके आणि आराखडे  तात्काळ तयार करावेत.तसेच जलसंधारणाची कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजयाचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

 श्री.गडाख यांच्या अध्यक्षतेखाली शिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे जल जीवन मिशन,ग्रामीण रमाई आवास योजना आणि मृद व जलसंधारण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले,आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जि.प मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा पोलीस अधिक्षक नीवा जैंन,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विकास जाधव,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर,समाज कल्याणचे सहायक आयुक्त बी.डी अरावत, जिल्हा मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सी.के कलशेट्टी ,अतिरिक्त जिल्हा जलसंधारण अधिकारी(जि.प) व्यंकटेश जोशी आदी उपस्थित होते.

 श्री. गडाख पुढे म्हणाले कार्यारंभ आदेश देऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे.जिल्हास्तरावर येणाऱ्या तांत्रिक अडचणीबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे .तसेच स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जिल्ह्यातील अडचणीबाबत पाठपुरावा करणार.जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटी पेक्षा जास्त रकमेच्या योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेमार्फत करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले यावेळी दिले.

 ग्रामीण रमाई आवास योजनेचा आढावा घेतांना वाशी व परंडा तालुक्यातील एकही प्रस्ताव दाखल नसल्यामुळे पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली तसेच संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करून पुन्हा जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून हे काम पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले .यावेळी उपस्थित समाज कल्याणचे सहायक आयुक्त कार्यलय  ,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक  व  मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत दुरुस्तीकरिता प्रस्तावित कामे व इतर योजनांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही करावी मृद व जलसंधारण विभाग मुख्यमंत्री जल संवर्धन योजना व जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर असलेली कामे चालू महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले यावेळी उपस्थित जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी यांना दिले.


 
Top