उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील वरुडा गावातील तीन शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात बीबीएफ आणि स्पायरल सेप्रेटरचे वाटप राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री श्री.शंकरराव गडाख यांच्या हस्ते आज करण्यात आले. जिल्ह्यास 2020 मध्ये कृषी व जलसंधारण कामांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नीती आयोगाचे 03.00 कोटी रुपये प्राप्त बक्षीस रक्कमेतून मंजूर आराखड्यानुसार 508 बीबीएफ, 1587 स्पायरल ग्रॅव्हेटी सेप्रेटर आणि 100 स्थानिक भाजीपाला बियाणे किटचे वाटप करण्यात येत आहे.

तसेच महाडीबीटी प्रणालीवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण योजनेत उस्मानाबाद तालुक्यातील वरुडा, जागजी आणि टाकळी बे. येथील लाभ मिळालेल्या शेतकरी आणि शेतकरी गटास लाभार्थींना तीन ट्रक्टर आणि एक मळणीयंत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक श्रीमती नीवा जैन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर आदीं प्रमुख उपस्थिती होते.


 
Top