उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हयातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना शोधण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यंक्तीची समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्यातील यंत्रमाग बहुल भागातून आठ सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे.असे समिती सचिव तथा प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग,मुंबई यांनी कळविलेले आहे.सदर समिती जिल्हयाचा यंत्रमाग बहुल भागाचा दौरा करून यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्याबाबत अहवाल शासनास सादर करणार आहेत.उस्मानाबाद जिल्हयातील खाजगी तसेच सहकारी संस्थांची पदाधिकारी,सभासद यांनी आपले समस्यांचे निवेदन सूचना असल्यास दि.19 मे 2022 रोजी उस्मानाबाद येथील शासकीय विश्राम गृह येथे उपस्थित राहुन निवेदन देण्यात यावे.

 
Top