उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आधारित पुस्तिका,कॅलेंडर आणि जिल्हयातील पर्यटन स्थळांची माहिती असलेल्या उस्मानाबाद ऐतिहासिक प्राचीन पर्यटन स्थळं या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी चित्ररथ,एलईडी व्हॅनने,तर राज्यशासनाच्या योजनाच्या चित्ररथाचे उदघाटन पोलीस अधीक्षक नीवा जैन यांच्या हस्ते करण्यात आले.

  हे चित्ररथ जिल्हयातील 306 गावांत जाणार आहेत. या चित्ररथासोबत एलईडी व्दारे शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दृकश्राव्य स्वरूपात देण्यात येणार आहे.तसेच सामाजिक न्या विभागाच्या योजनावर आधारित पुस्तिका,कॅलेडर तसेच पर्यटन पुस्तिकांचे  या गावांतून वाटपही करण्यात येणार आहे.

  या प्रसंगी जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता ,अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती.पी.पी.शिंदे, जि.प.चे अतिरिक्त  मुख्याधिकारी विकास जाधव,निवासी उपजिल्हाकारी शिवकुमार स्वामी,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत, जि.प.चे समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुल जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांच्या अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 
Top