उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हयातील जनतेला राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.   त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने ते येथील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, तथापि,त्यांनी जिल्हयातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    शुभेच्छा संदेशात त्यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान आणि बलिदान दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना मी सर्व प्रथम अभिवादन करतो. 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून राज्याने सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी झेप घेतली आहे. राजकीय, सामाजिक, साहित्य-संस्कृती, कृषी, फलोत्पादन, जलसंधारण, औद्योगिक क्षेत्रात अभूतपूर्व विकास साधला आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे. आज आपण जागतिक कामगार दिन सुध्दा साजरा करीत आहोत. देशाला प्रगतीपथावर आणण्यात कामगारांचा मोठा वाटा असल्याने त्यांचेही अभिनंदन करुन त्यांना कामगार दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो, असेही त्यानी या संदेशात म्हटले आहे

 
Top