उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कृषी महाविद्यालय आळणी येथे दि. 23 मे रोजी झायडेक्स बायोफर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा कॅम्पस इंटरव्ह्यू कार्यक्रम पार पडला.

सदरील निवड प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाच्या अंतिम सत्रातील एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.त्यामधून अंतिम आठ विद्यार्थ्यांची निवड कंपनीच्या निवड समितीने केली. 

 झायडेक्स बायोफर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड ही जैविक कृषी निविष्ठा उत्पादने आधारित अग्रगणी कंपनी असून जैविक खत निर्मितीमध्ये मोलाची कामगिरी बजावत आहे. सदरील कंपनीचे कार्य हे देशात तसेच देशाबाहेरही आहे. सध्याच्या बेरोजगारीच्या काळामध्ये महाविद्यालयाच्या अथक पाठपुराव्यातून झायडेक्स बायोफर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आमंत्रित करण्यात आले होते. 

 कंपनीच्या परिसर मुलाखतीमध्ये  सुमित गंगथडे,ओमकार गजभार,चैतन्य पाटील,गौरव गायकवाड, अक्षय मेहेर,शुभम चिखलकर,दर्शन यादव,नील किरण काकडे या विद्यार्थ्यांची निवड झाली. सदरील निवड झालेले विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याच्या कंपनीच्या कार्यकक्षेत कंपनीचे कृषी क्षेत्र संलग्न काम पाहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी एक सक्षम रोजगार मिळवून  देण्याचा उत्तम प्रयत्न महाविद्यालयाने सदरील उपक्रमांमधून दर्शविला आहे. 

 कॅम्पस इंटरव्यू मधून निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे धनेश्र्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.तसेच त्यांच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यानी आपल्या अभ्यासक्रमाला कष्ट,जिद्द, सातत्य यांची जोड देऊन आपल्याला अपेक्षित असे यश हे आपल्या पात्रतेच्या जोरावर खेचून आणण्याचे आवाहन केले.भविष्यामध्ये कृषी क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्या तसेच कृषी आधारित उद्योग यामध्ये महाविद्यालयाचे जास्तीत जास्त विद्यार्थी कसे निवडले जाऊन रोजगाराभिमुख कार्यक्रमांचे आयोजन तसेच कृषी औद्योगिक कंपन्यांना प्रत्यक्ष परिसर मुलाखतीसाठी आमंत्रित करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. 

 विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष परिसर मुलाखतीची पूर्वतयारी ही प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा.कानिफनाथ बुरगुटे यांनी पार पाडली. सदरील कामासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.क्रांतिसिंह पाटील, प्रा. कालिदास बंडे ,प्रा.सुतार एन.एस., प्रा.सचिन खताळ, प्रा.परमेश्वर गायकवाड, प्रा.सुनील भालेकर,प्रा.सौ.एस.एन.पाटील ,साबळे एस.एन, वाकळे ए.जी ,पठाण रबाना यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच परिसर मुलाखत कार्यक्रम पुर्व नियोजन कार्यक्रमामध्ये महाविद्यालय प्रशासक प्रा.हरी घाडगे,रामचंद्र सुतार,गुलाब मुजावर यांनी मोलाची भूमिका बजावली.

 
Top